War Impact on India: पश्चिम आशियातील संघर्ष भारताला किती महाग पडणार? तेल, महागाई, रुपया आणि शेअर बाजारावर वाढला दबाव

Petrol-Diesel-Inflation-Rupaya: पश्चिम आशियातील संघर्ष लांबत चालल्याने कच्च्या तेलाच्या किमती, महागाई आणि रुपयावर दबाव वाढू लागला आहे. याचा परिणाम शेअर बाजार, गुंतवणूक आणि सर्वसामान्यांच्या खर्चावर होण्याची शक्यता नेशनल स्टॉक एक्सचेंजच्या 'मार्केट पल्स' रिपोर्टमध्ये व्यक्त केली जात आहे.
War Impact on India: How the West Asia Conflict Could Hit Your Wallet Hard

War Impact on India: How the West Asia Conflict Could Hit Your Wallet Hard

eSakal

Updated on

जग अजूनही पश्चिम आशियातील संघर्षाच्या सावटाखाली जगत होते. सुरुवातीला हा संघर्ष काही दिवसांत थांबेल, असे अनेकांना वाटत होते. बाजारपेठांनीही त्याकडे तात्पुरत्या धक्क्याप्रमाणे पाहिले. पण काळ जसजसा पुढे गेला, तसतसे स्पष्ट होत गेले की हा फक्त सीमावाद नाही; तर जागतिक अर्थव्यवस्थेच्या नसांवर परिणाम करणारा दीर्घकालीन ताण आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, युद्धविरामाच्या घोषणा झाल्या, पण प्रत्येक वेळी आशेनंतर पुन्हा अनिश्चिततेची लाट आली. आता प्रश्न संघर्ष कधी सुरू झाला याचा नव्हता, तर तो किती काळ टिकणार याचा होता. कारण जितका संघर्ष लांबेल, तितका त्याचा परिणाम वाढ, महागाई, चलन, व्यापार आणि सरकारांच्या धोरणक्षमतेवर होणार होता. भारतही याला अपवाद नव्हता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com