स्मार्ट सल्ला : गुगल, ॲमेझॉनसारखे भाडेकरू असल्यास...

व्हाईटओक कॅपिटलची डिव्हिडंड यिल्ड योजना रिट्स-इन्व्हिट्समधून नियमित लाभांश देत निवृत्तीनंतर पेन्शनसदृश उत्पन्नाची संधी; कमी अस्थिरता, अनुभवी व्यवस्थापन आणि करसवलतींचा लाभ
Representative image showing investors gaining indirect exposure to commercial real estate and infrastructure through REITs and InvITs, with corporate office tenants and regular income as the theme.

Representative image showing investors gaining indirect exposure to commercial real estate and infrastructure through REITs and InvITs, with corporate office tenants and regular income as the theme.

Sakal

Updated on

सुहास राजदेरकर, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार

गुगल, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांना जागा भाडेतत्त्वावर देऊन निवृत्तीनंतर नियमित चांगले उत्पन्न मिळवून पेन्शनकाठी सहज मिळवण्याचा मार्ग मोकळा केला आहे, तो व्हाईटओक कॅपिटल म्युच्युअल फंडाच्या डिव्हिडंड यिल्ड योजनेद्वारे. हा ‘एनएफओ’ २४ ऑगस्टपर्यंत खुला राहील. त्यानंतर योजना सातत्याने खुली राहील. ही भारतीय भांडवली बाजारातील पहिली अशी अॅक्टिव्ह म्युच्युअल फंड योजना आहे, जी शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या रिट्स (रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट) आणि इन्व्हिट्समध्ये (इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट) गुंतवणूक करणार आहे. या योजनेतील सुमारे ७० टक्के रक्कम रिट्स व इन्व्हिट्समध्ये गुंतवली जाणार आहे. त्यामुळे रिअल इस्टेटमधील फायदे मिळवता येतील आणि त्यातील अनेक तोटे टाळता येतील. उर्वरित ३० टक्के रक्कम अधिक लाभांश देणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये; तसेच रोखे विभागात गुंतवली जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com