

Business Cycle Funds: Investing with Economic Trends
Sakal
प्रशांत वाघ, ल्डनबुल्स फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रा. लि.
भारतीय अर्थव्यवस्थेने मागील २५ वर्षांत अनेक व्यापारचक्रांचा सामना केला आहे. याची सुरुवात झाली, ती २००० च्या दशकाच्या सुरुवातीला डॉट-कॉमचा बुडबुडा फुटल्यानंतर आलेल्या सौम्य मंदीपासून. त्यानंतर २००८ च्या जागतिक आर्थिक संकटापर्यंत टिकलेले एक वाढीचे चक्र आले. त्यानंतर २००९ ते २०१२ दरम्यान प्रोत्साहन-आधारित पुनरुज्जीवन झाले, त्याला नंतर २०१० च्या मध्यात ‘टेपर टँट्रम’मुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेने आळा बसला. जीएसटीची अंमलबजावणी, नोटबंदी, तसेच नादारी व दिवाळखोरी संहिता (आयबीसी) अशा अनेक धोरणात्मक सुधारणा २०१६-२०१७ या काळात झाल्या.