

The Intersection of Mindfulness and Capital Markets
Sakal
नंदिनी वैद्य, ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार
‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ काल २१ जून रोजी आपण सर्वांनी साजरा केला. वास्तविक भारतीय योग हा केवळ व्यायाम प्रकार नसून, मूळ जीवनपद्धती आहे, जेथे आपण व्यक्ती म्हणजे जीवात्मा ईश्वराशी जोडले जाऊ शकतो आणि यासाठीच योगासने, प्राणायाम यांचा आधार घेतला जातो. जीवनाच्या सर्व अंगांना जो स्पर्शून जातो तो म्हणजे ‘योग’. व्यक्तीच्या जीवनात असे हे जोडलेले असणे जितके अधिक तितकी तिच्या जीवनाची गुणवत्ता अधिक असते. अर्थात, गुंतवणूक क्षेत्रही त्यापासून वेगळे नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीला यशस्वी गुंतवणूकदार व्हावयाचे असते तेव्हा त्याच्याजवळ किती पैसे आहेत, हे अधिक महत्त्वाचे नसून, त्याचे मन त्याच्या किती ताब्यात आहे, संयमी आहे हे महत्त्वाचे असते, कारण मन हाच शरीराचा चालक असतो आणि अगदी याच मुद्द्यावर भारतीय योगशास्त्र बोट ठेवते.