
Zydus Wellness stock sees significant rise after consolidation.
Sakal
मकरंद विपट - ‘सेबी’ रजिस्टर्ड रिसर्च ॲनालिस्ट
‘झायडस वेलनेस’ ही आरोग्यासाठी उपयुक्त उत्पादनांचा विकास, उत्पादन, विपणन आणि वितरण करणारी एकात्मिक ग्राहक कंपनी आहे. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये शुगर फ्री, एव्हरयूथ आणि न्यूट्रालाइट यांसारखे ब्रँड समाविष्ट आहेत. कंपनीच्या शेअरने सप्टेंबर २०२१ मध्ये २४७६ रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर या शेअरच्या भावात जवळपास ४५ टक्क्यांची घसरण पाहण्यात आली आणि या शेअरचा भाव १४०० रुपयांपर्यंत खाली आला. त्यानंतर काही काळ एका मर्यादित पातळीत भाव राहिला आणि ऑगस्ट २०२४ मध्ये पुन्हा या शेअरच्या भावाने २४८४ रुपयांची पातळी गाठली आणि परत २००० रुपयांपर्यंत खाली घसरला.