धाडसी, प्रागतिक आणि सर्वस्पर्शी धोरण

education
education

शिक्षणव्यवस्थेच्या दृष्टीने एका ऐतिहासिक बदलाच्या वळणावर आपण आहोत. जवळजवळ ३४ वर्षांनंतर आधीच्या धोरणांचा फेरआढावा घेऊन आपण नव्या धोरणाचा स्वीकार केला. गेली अनेक वर्षे त्यावर काम सुरू होते. शिक्षक, तज्ज्ञ, सर्वसामान्य व्यक्ती या शिक्षणाशी संबंधित सर्व घटकांचे मत घेण्यात आले. एवढेच नव्हे तर देशभरातील अडीच लाख ग्रामपंचायतींकडूनही माहिती गोळा करण्यात आली. त्याआधारे या नव्या धोरणाचा मसुदा करण्यात आला. संयुक्तिक सुधारणांना चालना  देणारे  ‘एनईपी- २०२०’ हे अत्याधुनिक संशोधनाधारित आणि सर्वोत्तम पद्धतींचे एकत्रीकरण आहे. 

शैक्षणिक सुधारणांचा आराखडा तयार करण्याचे काम आधीपासूनच सुरू होते. विशेषतः ‘शालेय शिक्षणाच्या दर्जाचा निर्देशांक’ (स्कूल एजुकेशन क्वालिटी इंडेक्स) हा उपक्रम `नीती आयोगा`ने सुरु केला होता. याशिवाय शिक्षणातील मानवी भांडवलात सातत्याने आणि आमूलाग्र बदल घडवण्याचा कृती कार्यक्रम आणि `प्रगतीशील जिल्हा कार्यक्रम`ही हाती घेण्यात आला होता. अशा व्यापक प्रयत्नांमुळे काळाची हाक ओळखणारे, प्रागतिक धोरण आकाराला आले. सार्वत्रिक शिक्षणसंधी, दर्जा, पायाभूत सुविधा, प्रशासकीय कारभार आणि शिकवण्याची प्रक्रिया या सर्व पैलूंना त्यात स्पर्श करण्यात आला आहे. या सर्व गोष्टींकडे समग्रपणे पाहणारे हे धोरण आहे, हे विशेष. नवा भारत घडवण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अंत्योदयाचे तत्त्व
अगदी बालवयापासून ते उच्च शिक्षणाच्या पातळीपर्यंत शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करू पाहणारे हे धोरण आहे. शाळेबाहेर असलेल्या दोन कोटी मुलांना शिक्षणाच्या परिघात आणण्याचा हा प्रयत्न असून वंचित घटकांचा त्यात विचार करण्यात आला आहे. या धोरणामागे अंत्योदयाचे तत्त्व आहे. 

जुन्या पद्धतीत आमूलाग्र बदल 
कामाच्या, अध्यापनाच्या पारंपारिक पद्धतीतही आमूलाग्र बदल सुचवण्यात आले आहेत. नव्या अभ्यासक्रमाच्या सहाय्याने लहान बालकांची काळजी तर घेतली जाईलच, त्याचबरोबर त्यांना वेगवेगळे सर्जनशील खेळ खेळण्यास दिले जातील. अक्षरओळख (साक्षरता मिशन) आणि आकडेमोड यासाठी सध्या सुरु असलेल्या मूलभूत कार्यक्रमांची जोड असेलच. 

शिक्षणांचे भक्कम अधिष्ठान निर्माण करणारे हे धोरण आहे. अभ्यासक्रमांतर्गत विषय आणि अभ्यासक्रमबाह्य विषय यासारख्या भिंती आता काढून टाकण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे उच्च शिक्षणात आत येण्याचे आणि बाहेर पडण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे आलेली लवचिकता विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल. त्यांना त्यांच्या आवडी जोपासत शिकता येईल. हे शिक्षण आनंदायी असेल. नव्या अभ्यासक्रमामुळे  निम्म्या विद्यार्थ्यांना तरी निश्चितच एखादे व्यावसायिक कौशल्य शिकण्याची संधी मिळणार आहे.

‘परख’चे यश
नीती आयोगाच्या धोरणानुसार `जे मोजले जाऊ शकत नाही, त्यात सुधारणाही केल्या जाऊ शकत नाहीत`. आत्तापर्यंत,भारताकडे शिकण्याच्या परिणामांची नियमित, विश्वासार्ह आणि तुलनात्मक मूल्यांकनासाठी एक विस्तृत प्रणाली नाही. परख (राष्ट्रीय कामगिरी मूल्यांकन, समग्र विकासासाठी ज्ञानाचे पुनरावलोकन आणि विश्लेषण केंद्र) नावाच्या `राष्ट्रीय मूल्यांकन केंद्रा`ची स्थापना यशस्वी झाली, हा त्यामुळेच आनंदाचा भाग आहे. शिकण्याचा सतत मागोवा, लवचिक बोर्ड परीक्षा, वैचारिक आकलन आणि एआय-सक्षम डेटा प्रणाली यामुळे हे केंद्र परिणामकारक ठरेल.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिक्षकांसाठी काय?
`शिक्षकांचे शिक्षण`याही महत्त्वाच्या मुद्द्याचा विचार करण्यात आला आहे. नवीन व्यापक अभ्यासक्रमाची चौकट आणतानाच निकृष्ट संस्थांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.  धाडसी सुधारणांच्या माध्यमातून शिक्षणास बळकटी देण्यात येईल. स्पर्धात्मक शिक्षण, संवादावर भर देणारी अध्यापनशैली, गुणवत्ता-आधारित शिक्षकनिवड, त्यासाठीचे योग्य निकष आणि पारदर्शक प्रणालींसाठी शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांकाचा आधार घेणे हीदेखील  नव्या धोरणाची वैशिष्ट्ये आहेत. या बदलांमुळे  घोकंपट्टी (पठण अध्ययन) पद्धतीला सोडचिठ्ठी देण्यात आली आहे. सराव आधारित अभ्यासक्रम आणि स्थानिक व्यावसायिक तज्ञांसह इंटर्नशिपच्या माध्यमातून ‘एनईपी- २०२०’ ची लोकविद्या ही पंतप्रधानाच्या ‘लोकल फॉर व्होकल’ या घोषणेची पुष्टी करणारे आहे. 

भारतीयांनी भारतीयांसाठी तयार केलेले हे नवे शिक्षण धोरण ऐतिहासिक म्हणावे लागेल. त्याची  प्रभावी अंमलबजावणी पुढच्या पिढ्यांच्या आयुष्यात बदल घडवेल, हे नक्की. भारताला ज्ञानाधारित शक्तीकडे नेणारी ही वाटचाल आहे. 

भारताचे ब्रॅंडिंग
उच्च शिक्षणात शैक्षणिक पतपेढी (अॅकेडमिक क्रेडीट बँक) तयार करण्याची कल्पनाही शिक्षण क्षेत्रातील भारताचे ब्रॅंडिंग सुधारण्यास उपयुक्त ठरेल..  बहुभाषिक शिक्षण आणि ज्ञानवर्धनाच्या प्रयत्नांमुळे  तक्षशिला आणि नालंदाच्या गौरवशाली वारशाला उजाळा मिळेल..गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे जाणारा भारताचा प्रवास वेगाने करण्यासाठी नवे धोरण योग्य दिशेने जाणारे एक स्वागतार्ह पाऊल आहे. सर्वसमावेशक डिजिटल शिक्षण चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या दिशेने जाण्याच्या भारताच्या वाटचालीला बळकट करेल. प्रत्येक धोरणाप्रमाणेच या धोरणाची खरी परीक्षा ही कागदावरील धोरण प्रत्यक्षात आणण्यात होणार आहे. भारतीयांनी भारतीयांसाठी तयार केलेले हे धोरण आहे. त्याची  प्रभावी अंमलबजावणी पुढच्या पिढ्यांच्या आयुष्यात बदल घडवेल, हे नक्की. ज्ञानाधारित शक्तीकडे नेणारी ही वाटचाल आहे. 

(लेखक `नीती` आयोगाचे सीईओ आहेत. लेखातील मते वैयक्तिक.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com