Nargis Mohammadi : मानवाधिकारासाठी लढणारी रणरागिनी

शांततेचा नोबेल सन्मान जाहीर झाल्याने नर्गीस मोहंमदी हे नाव जगभर चर्चेचा विषय ठरले आहे. सध्या तुरुंगात कैदेत असलेल्या या रणरागिनीवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
Nargis Mohammadi
Nargis Mohammadisakal

शांततेचा नोबेल सन्मान जाहीर झाल्याने नर्गीस मोहंमदी हे नाव जगभर चर्चेचा विषय ठरले आहे. सध्या तुरुंगात कैदेत असलेल्या या रणरागिनीवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. कोण आहेत या नर्गीस? नेमका कशामुळे त्यांना हा सन्मान मिळाला आहे? या लढवय्या महिलेच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.

नर्गीस या इराणमधील आघाडीच्या मानवाधिकार कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी महिलांच्या हक्काबरोबरच मृत्युदंडाची शिक्षा रद्द व्हावी म्हणून देखील दीर्घकाळ लढा दिला होता. नर्गीस यांचा जन्म १९७२ साली इराणच्या वायव्येकडील झानजान प्रांतामध्ये झाला होता. अभियंता होण्यापूर्वी त्यांनी भौतिकशास्त्राचाही अभ्यास केला होता. नंतर त्यांनी पत्रकारितेमध्ये करिअरला सुरूवात केली.

पत्रकारिता करतानाच त्यांनी सुधारणावादी लढ्यामध्ये उडी घेतली. अनेक प्रकरणांमध्ये इराणमधील न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावल्या असून नुकतीच त्यांना तेरा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. सध्या त्यांना इराणमधील इव्हिन प्रिझन येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

२२ व्या वर्षी पहिली अटक

नर्गीस यांना वयाच्या २२ व्या वर्षी पहिल्यांदा अटक झाली होती. सध्या त्यांचे वय ५१ वर्षे एवढे असून दोन दशकांपेक्षाही अधिककाळ त्यांनी तुरुंगातच व्यतीत केला असून जेव्हा-जेव्हा बाहेर येण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी मानवाधिकाराचा आवाज बुलंद केला होता. त्या २०२१ पासून तुरुंगातच कैद आहेत.इराणमध्ये धर्मसत्तेला आव्हान देताना मृत्युदंडाची शिक्षा आणि हिजाब सक्तीला त्यांनी कडाडून विरोध केला होता. सरकारने तुरुंगात टाकल्यानंतर देखील त्यांनी या लढ्यातून माघार घ्यायला नकार दिला होता. ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या संस्थेने नर्गीस यांचा गौरव करताना त्यांना ‘विवेकबुद्धी जागृत असलेला कैदी’ अशी उपाधी दिली होती.

आसूडाच्या फटक्यांची शिक्षा

सध्या त्या १९ वर्षांच्या कैदेची शिक्षा भोगत असून त्यांना १५४ आसूडाचे फटके मारण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले होते. तुरुंगात राहून देखील कारवाया केल्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना कियानी आणि अली अशी दोन मुले असून त्यांच्या पतीचे नाव रहमानी असे आहे. या शिक्षेमुळे या सर्वांना आपण मुकलो असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या लग्नाला २४ वर्षे झाली असून या काळात त्यांना फक्त पाच ते सहा वर्षे पतीसोबत राहायची संधी मिळाली.

इबादींच्या नेतृत्वाखाली काम

नर्गीस यांनी २००० मध्ये ‘सेंटर फॉर ह्युमन राईट्स डिफेंडर्स’मध्ये सहभाग घेतला होता. इराणमधील विधिज्ञ शिरीन इबादी यांनी त्याची स्थापना केली होती. पुढे त्यांनी २००३ मध्ये मृत्युदंडाची शिक्षा रद्द केली जावी म्हणून देखील मोठा लढा उभारला होता. मोहंमदी या ‘डिफेंडर्स ऑफ ह्यूमन राईट्स सेंटर’च्या उपप्रमुख आहेत. या केंद्राच्या प्रमुख शिरीन इबादी यांना २००३ मध्ये शांततेचा नोबेल सन्मान मिळाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com