
- डॉ. कांचनगंगा गंधे (पुणे)
- अशोककुमार सिंग (लखनौ)
हिंदू धर्मात देवदेवतांच्या पूजासामग्रीत फुलांना विशेष महत्त्व आहे. त्याचे उल्लेख वेद, पुराण आणि इतर प्राचीन साहित्यात आहेत. विष्णू पुराणामध्ये प्रकृती, निसर्ग, झाडं, फुलं यांच्या संदर्भात एक श्लोक आहे. ‘पुष्पाणि दृष्टा मुमुक्षुर्विष्णुं ध्यायते।’ फुलं म्हणजे शुद्धतेचं आणि शांततेचं प्रतीक! हिंदू संस्कृती आणि कमळ यांचं आध्यात्मिक नातं सहा हजार वर्षांपूर्वीचं असल्याचे उल्लेख ऋग्वेद, आयुर्वेदात आहेत. सर्व फुलांमध्ये कमळ फुलाला विशेष महत्त्व आहे.