

The witty Marathi column ends with an unexpected twist, using humour and satire to leave readers smiling.
Sakal
नुकताच पाऊस पडून गेला होता. (अरण्यकथेची सुरुवात अशीच असते, ज्जा!) झाडेझुडे अजून ओली होती. (आता पाऊस पडून गेल्यावर काय होणार? कैच्या कैच!!) तेंदूच्या वृक्षावर वानरांचा कळप आराम करत होता. काही वानरे उगीच पाने वळत फांद्यांवर बसली होती. (पाने वळत होती, विड्या नव्हे!) पाणवठ्यावर हल्ली कुणीही फारसे येत नाही. जिथे तिथे रानात डबकी साचल्याने वन्यजीवांची तहान जवळच भागते. उगीच कोण पाणवठ्यापर्यंत तंगड्या तोडत जाईल? (नोंद : प्राण्यांनाही मॉर्निंग वॉकचा कंटाळा येतोच.) पण पाऊस थांबला की कुणी ना कुणी टहलायला इथे येतेच. हळू हळू वन्यजीव येतात. एक वाघाची जोडी पायवाटेवर किरण साधून बराच वेळ बसली होती. एखादा चांगलासा काळवीट बघून व्याघ्रदिन साजरा करण्याचा त्यांचा इरादा होता. वाघाची जोडी ही पिता आणि लेकराची होती. लेकराला आता शिकारीचे शिक्षण द्यायला हवे, असे बाबा वाघांनी मनावर घेतले होते…