ढिंग टांग : औट ऑफ फॉर्म!

british nandi writes about politics balasaheb thorat Mallikarjun Kharge
british nandi writes about politics balasaheb thorat Mallikarjun Khargesakal

मि. खारगेजी, (पार्टी प्रेसिडेंट) प्रणाम. महाराष्ट्रामध्ये हे काय चाललं आहे? आय जस्ट कांट अंडरस्टँड!! नाशिकला कुणी एक ग्रॅज्युएट कँडिडेट होता, त्याच्या मॅटर्नल अंकलचं (पक्षी : मामांचं ) पत्र कालच माझ्या टेबलावर आलं. हे मामा म्हणजे आपले श्री. बॅलासाहब थोरात! आय अंडरस्टँड दॅट ही इज अ रिअल लॉयल सोल्जर ऑफ आवर एस्टीम्ड पार्टी!!

नासिकमध्ये आपल्या उमेदवाराला तिकिट दिलं. पण ते त्यांना नको होतं. माझ्याऐवजी माझ्या मुलाला द्या, असं त्यांचं म्हणणं होतं. दॅट मुलगा इज बॅलासाहबचा भाचा ना? मग त्याला तिकिट का दिलं नाही? तो यंग मॅन अपक्ष म्हणून निवडून आला आणि जिंकला म्हणे! आपल्या पार्टीने त्यालाच दोन-दोन एबी फॉर्म वाटले, आणि तेही चुकीचे! नंतर एक दिला तो त्याच्या वडलांचं नाव घालून! यह सब क्या है? कृपया चोवीस तासात खुलासा करावा. नाहीतर…नाहीतर काही नाही. श्री. बॅलासाहब खूप दु:खी झाले आहेत. खुलासा करा. युअर्स, महामॅडम. (हायकमांड)

ता क. : महाराष्ट्रात महाविकास आघाडी होती ना? तिचं काय झालं? रिपोर्ट मी इमिजिएटली. श्रीमान नानाभौ पटोलेजी, हम यह क्या सुन रहा है? तुम्ही महाराष्ट्रात काय घोळ करुन ठेवला ? महाराष्ट्रात ‘बाळासाहेबांची काँग्रेस’ आणि ‘नानाभौंची काँग्रेस’ अशा दोन पार्ट्या आहेत का? असे लोक विचारत आहेत. क्या बोलनेका? ये क्या हो गया? ए इलेक्शन अम आरामसे जितेगा बोलके गया ता ना? अब अईसा कईसा आर गया इलेक्शन? अपने बालासाहब थोरातजीला छब्बीस मिस कॉल आया. मैं उठाया नै. कुच एबी फॉर्म का प्रॉब्लेम हुआ अईसा सुनने में आया.

अपना मॅडम बहोत भडक गया. हमकू बोला, इन्क्वायरी बिठानेको! मेरे को कुच समझाही नै, तो मैं क्या बोलता? मॅडमजी का मेमो आया, तब्बी जाके समझ में आया. जल्दी से जल्दी खुलासा किजिए. आपका (अध्यक्ष )

आदरणीय महामॅडम, प्रणाम. आपल्या समर्थ नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रामध्ये आपला पक्ष अतिशय जोरात काम करत असून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पाचपैकी दोन जागा जिंकल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. काही नेत्यांचा तर अजूनही विश्वास बसत नाही. आपले नांदेडचे चव्हाणसाहेब आणि कराडचे दुसरे चव्हाणसाहेब दोघांनीही ‘ही काहीतरी गंडवागंडवी असावी, असं होणंच शक्य नाही’ अशी पैज लावली होती, असे कळते.

नाशिकच्या उमेदवाराला पक्षाकडून ‘एबी फॉर्म’ दोन गेले हे खरे आहे. पण आता वडील आणि मुलग्याने सेपरेट फोन केले आणि ‘मी तांबे बोलतोय’ असे सांगितले तर काय करणार? दोघांनाही घाईघाईने (सही करुन) फॉर्म पाठवून दिले. आता ते दुसऱ्याच मतदारसंघाचे होते, हा निव्वळ ‘बॅडलक’चा भाग आहे. खूप वर्षांपूर्वी मी असाच घाईघाईत (चुकून) भाजपचा एबी फॉर्म भरुन निवडूनही आलो होतो…जाऊ दे.

कधी कधी आपण चुकून घराची चावी समजून कपाटाचीच घेऊन येतो, आणि दार बंद झाल्यावर चावी आतच राहिली, अशी सिच्युएशन निर्माण होते. तसेच झाले. आता सर्व काही ठीक आहे. आमचे संगमनेराचे बाळासाहेब रागावले. पण मी त्यांची समजूत काढीन. पेढे घेऊनच जाईन! ते मवाळ स्वभावाचे आहेत. ऐकतील! आपला आज्ञाधारक कार्यकर्ता. नानाभौ.

ता. क. : महाविकास आघाडी अतिशय एकोप्याने, एकजुटीने आणि एकदिलाने काम करत आहे. काळजी नसावी!

प्रत रवाना : अध्यक्ष, काँग्रेस.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com