व्यावसायिकतेची रुजवात

‘हुसाको’ हा अशाच हृषीकेश ठोके, चैत्राली पदमवार आणि अनुष्का जाधव या तरुणांनी सुरू केलेला व्यवसाय.
degree in architecture business startup hrishikesh thoke chitrali padamwar
degree in architecture business startup hrishikesh thoke chitrali padamwarsakal

- ललितागौरी कुलकर्णी

पुण्यासारख्या ठिकाणी अनेक तरुण वास्तूविशारद पदवी घेऊन या क्षेत्रात मोठ्या हिरीरीने स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. ‘हुसाको’ हा अशाच हृषीकेश ठोके, चैत्राली पदमवार आणि अनुष्का जाधव या तरुणांनी सुरू केलेला व्यवसाय. पदवीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला उमेदवारी किंवा इंटर्नशिप करावी लागते.

ही संधी डोळसपणाने घेऊन ह्रषीकेशने चक्क नेपाळमधील वास्तूूविशारदाकडे काम केले. आव्हानांवर मात करत योग्य निर्णय घेत काम कसे करायचे, याचे प्रशिक्षण त्याला मिळाले. चैत्रालीने प्रस्थापित बांधकाम व्यावसायिकाकडे व्यावसायिक खाचाखोचांचा अनुभव घेतला. अनुष्काने स्टार्टअपमध्ये उमेदवारी केल्याने तेथे वास्तुकलेशी निगडित गोष्टींबरोबर व्यवसायासंबंधित बारकावेही शिकायची संधी तिला मिळाली.

या तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे, तो फक्त अर्थर्जनासाठी नव्हे तर आवडीच्या क्षेत्रात, आपल्या पद्धतीने स्वतंत्रपणे काम करण्यासाठी, आपली ओळख निर्माण करण्यासाठी. व्यवसायातून प्राप्ती कमी-जास्त होणे, त्यासाठी वित्त नियोजन इत्यादी गोष्टी त्यांना अनुभवातून कळत गेल्या. ग्राहक अजूनही वास्तुविशारदाकडे गांभीर्याने पाहात नाही.

आर्किटेक्ट अत्यावश्यक नसून काही उच्चभ्रू लोकांचा हौसेचा मामला असतो, असा गैरसमज असतो. ग्राहकांनाही जाणकार करण्याची गरज ओळखून ते त्यांच्याशी संवाद साधतात. अनुभवी वास्तुविशारदांकडून पाठिंबा मिळतो, ते ग्राहकांकडे शिफारस करतात, असा या तरुणांचा अनुभव आहे.

सुरूवात करताना स्वतःचे ज्ञान, कसब आणि आत्मविश्वास हेच प्रमुख भांडवल असल्याने भांडवल उभारण्याचे आव्हान नाही. परंतु वास्तुविशारदाने कल्पिलेले वास्तवात कसे उतरते, हे अनेक पुरवठादार आणि कारागीर व कामगारांवर अवलंबून असते. त्यामुळे एकीकडे ग्राहक आणि दुसरीकडे हे कारागीर यांना सांभाळण्याची कसरत महत्त्वाची.

मध्यमवर्गातील सुशिक्षित तरुणांनी व्यावसायिक पदवी घेऊन चालू केलेली एक फर्म. यात नाट्यमय असं काही नसलं तरी त्यांच्या या ‘उद्यम’कथेतून केवळ होतकरू तरुणांनाच नव्हे; तर आजूबाजूच्या व्यवस्थेला अंतर्मुख करायला लावणाऱ्या काही गोष्टी दिसतात.

एक म्हणजे वास्तुविशारद व्यवसायासाठी कोणत्याही प्रकारचे नियमन किंवा कामाचा दर्जा ठरवणारी सर्वसाधारण पद्धती नाही. चार्टर्ड अकौंटन्ट, वास्तुविशारद अशा पदव्यांसाठी उमेदवारी करावी, असा नियम आहे.

हे व्यवसायिक प्रशिक्षण असल्याने त्या क्षेत्रातील कामाचा अनुभव घेऊन विद्यार्थ्यांनी शिकावे असा त्यामागचा उद्देश. प्रत्यक्षात बहुतेक विद्यार्थी या उमेदवारीकडे एक उरकण्याची गोष्ट म्हणून बघतात. काही वेळा विद्यावेतन मिळत नाही म्हणून उमेदवारी नाकारतात. मोठ्या कंपन्याही या उमेदवारांना फुटकळ कामे देऊन दुर्लक्षित ठेवतात.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी उमेदवारी आवर्जून एखाद्या नवीन छोट्या कंपनीमध्ये केली पाहिजे. या ‘उद्यम’कथेतून प्रकर्षाने जाणवणारी बाब म्हणजे एकीकडे व्यवसाय प्रशिक्षण, उद्योजकता विकास यावर भर देणारे धोरण आहे.

परंतु त्याचवेळी दुसरीकडे चार-पाच वर्षांच्या ‘व्यावसायिक’ पदवीच्या काळात ‘व्यवसाय’ प्रशिक्षण अजिबात दिले जात नाही. परंतु व्यवसायात यशस्वी होण्यासाठी ग्राहकाला समजेल अशा पद्धतीने आपल्या व्यवसायातील तांत्रिक बाबींची माहिती कशी द्यावी,

व्यवसायाची प्रसिद्धी कशी करावी, ग्राहक मिळवण्यासाठी काय करावे, वित्त-गुंतवणूक बाजू कशी सांभाळावी, आपल्या सहकाऱ्यांशी जुळवून घेऊन कसे पुढे जावे, या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. अशा, ‘व्यवसायिकाला’ उपयुक्त असलेल्या बाबींचे प्रशिक्षण व्यावसायिक पदवीअभ्यासक्रमात समाविष्ट करणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com