देह-संदेह : आपण सारे ‘नवे कुंभकर्ण’...

डिजिटल माध्यमांच्या अखंड मनोरंजनामुळे झोपेशी सुरू झालेल्या स्पर्धेचा आणि भांडवली व्यवस्थेच्या ‘जागृत उपभोगी’ माणसाच्या निर्मितीचा सखोल वेध
sleep

The famous 'Mogara Phulala' message symbolises inner purity, compassion and the fragrance of values nurtured through a Guru's guidance.

sakal

Updated on

विश्राम ढोले, माध्यम, तंत्रज्ञान व संस्कृतीचे अभ्यासक

नऊ वर्षांपूर्वी नेटफ्लिक्सने एक खळबळजनक ट्वीट केले होते, “झोप ही आमच्यासाठी सर्वात मोठी शत्रू आहे.” त्याच दरम्यान कंपनीचे संस्थापक रीड हेस्टिंग यांनीही “तुम्हाला जेव्हा ‘नेटफ्लिक्स’च्या कार्यक्रमाचे व्यसन लागते तेव्हा तुम्ही उशिरापर्यंत जागता. त्यामुळे आम्ही खरंतर झोपेशी स्पर्धा करीत आहोत; पण काठावर.” असे विधान केले होते. शत्रू म्हणो की स्पर्धक; झोप या मूलभूत मानवी गरजेकडे बघण्याचा ‘नेटफ्लिक्स’चा दृष्टिकोन पुरेसा स्पष्ट आहे. पण तो एकट्या ‘नेटफ्लिक्स’चा नाही. माणसांची जागृतावस्था म्हणजे मुख्यत्वे ‘कार्यक्षम उत्पादनासाठी वापरायचा कालावधी’ असे गृहितक असलेल्या एकूणच भांडवली व्यवस्थेचाही झोपेबद्दलचा दृष्टिकोन तसाच असतो. ‘नेटफ्लिक्स’ने तो अगदी नागड्या पातळीवर मांडला इतकेच. बाकी २४x७ तास चालण्याचे ब्रीद मानणाऱ्या, ‘दी सिटी नेव्हर स्लिप्स’ म्हणणाऱ्या, वस्तू आणि आशयाच्या निर्मितीसाठी अहोरात्र धपापणाऱ्या व्यापारीव्यवस्था अनेक आहेत. त्याही झोपेला अनुत्पादक स्थिती मानत कोणाच्या तरी झोपेच्या गरजांशी स्पर्धा करीत असतात. त्यांचा संकोच करीत असतात. बहुतेकवेळा गरजांचा हा संकोच सक्तीने नव्हे तर युक्तीने केला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com