अग्रलेख : नाही रे उजाडत...

नसरापूरच्या भीषण घटनेतून उघड झालेले कायदा-सुव्यवस्थेचे अपयश; पुनःपुन्हा गुन्हे करणाऱ्या नराधमाला वेळेवर कठोर शिक्षा न झाल्याने व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत
Editorial Analysis: The Nasrapur Horror and the System's Failure

Editorial Analysis: The Nasrapur Horror and the System's Failure

Sakal

Updated on

‘‘माणसाने केलेल्या सर्व कायद्यांची जर त्याला जरुरी पडत असेल, तर माणसांची जात महागुन्हेगार आहे, असेच म्हणावे लागेल,’’ अशा आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेली घटना पाहता या म्हणीची आठवण होणे स्वाभाविक आहे. सर्व जण ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करत असताना माणुसकीला लाजविणारे कृत्य घडत होते आणि एक कोवळा, निष्पाप जीव मानवी रूपात वावरणाऱ्या राक्षसी वृत्तीचा बळी ठरत होता. कोणालाही ऐकू न आलेल्या तिच्या किंकाळ्या आपल्या निर्ढावलेल्या व्यवस्थेला आर्त हाका मारत होत्या. अजून जगही व्यवस्थित न पाहिलेली एक कळी वासनेने पछाडलेल्या नराधमाची शिकार ठरली आणि आपल्या व्यवस्थेचे एका अर्थाने वस्त्रहरण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com