ढिंग टांग :  केम छो इमरानभाय?

imran
imran

इमरान : (फोन लावत घाईघाईने ) क्‍या मैं जनाब नमोजीसाहबसे बात कर सकता हूं?

नमोजी : (डोळे मिचकावत) नहीं! एवन कास्मीर गया छे!!

इमरान : (वैतागून) मला टाळू नका जनाब! बहोत शिद्दत के बाद आपको फोन लगाने में कामयाब हुआ हूं!! (कुजबुजत) तेवढ्यासाठी मला पायखान्यात यावं लागलं!! जनाब, मेरा दिल काश्‍मीर के अवाम के लिए रो रहा है!! 

नमोजी : (उपदेश करत) अरे कशाला टाइम खोटी करते? त्यापेक्षा तमारे पायाखाली शूं जले छे, आ तो देखो ने!! बहु हुश्‍शारी करता हता ने, हवे जुओ!! अमणां त्रणसोसत्तर तो गायब थई गया! ज्यादा आवाज करीश तो बद्धा पीओके, अने बलुचिस्तान, पछी-

इमरान (कळवळून) बस भी करो जनाब! ये जो आपने कश्‍मीर में किया वो बहुत जियादा बुरा किया! मला इथे किती लोकांना मुंह द्यावं लागतंय, काही कल्पना आहे का?  

नमोजी : (आव्हान देत) डाळ बगडे तो दिवस बगडे, अथाणु बगडे तो वरस...कछु सांभळ्यो? अवे तो सुधर जावो ने भाई!!  हवे शुं करीश?

इमरान : (गडबडून) शुं वगैरे काहीही करत नाहीए! वाट्टेल ते बोलू नका! आजपासून तुमच्या आणि आमच्यातले राजनैतिक संबंध खतम!! जहन्नुम में जाव!!

नमोजी : (खट्याळपणाने) हेहेहेहे!! तुमच्यात आणि आमच्यात राजनैतिक का काय म्हंटात ते संबंध होतेच कधी? नुसतं भांडण तर होतं! तुम्ही कुरापत काढायची आणि आम्ही वाजवायची, हेच तर चाललंय ने!!

इमरान : (आणखी गडबडून) मग तुमच्या-आमच्यातले व्यापारी संबंध खतम! आमचा कांदा तुम्हाला नाही, तुमचा नारळ आम्हाला नको! जाव!!

नमोजी : (आणखी खट्याळपणाने) लो कर लो बात!! पुलवामाच्या नंतर आम्हीच बेपार स्टॉप केला ने!!

इमरान : (चिडून) आमच्या आस्मानातून तुमचं हवाई जहाज उडालं तर आम्ही ते...आम्ही ते...(शब्द न सुचून) आम्ही ते उडवू!!

नमोजी : (चिडवत) उडत जा! 

इमरान : (संतापून) खामोश!

नमोजी : (शांतपणे) कशामाटे माथा गरम करूनशी घेते? काश्‍मीर आमच्या हता, छे, अने राहणार! छेल्ला वखत मी हेच सांगितला होता ने? तमे तो सुनतोज नथी! त्रणसोसत्तर क्‍यान्सल केला तो आमच्या अधिकार हाय!  

इमरान : (तावातावाने) आम्ही युद्ध करू!

नमोजी : (शांतपणे) प्यार महोब्बतमां वात करो ने! आ झगडा वगडा मां मजा नथी!! 

इमरान : हे बघा, मी युनोत जाईन! कोर्टात जाईन!! काश्‍मीरमध्ये तुम्ही जे काही केलंय ते बेकायदा आहे!

नमोजी : (समजूत घालत) तमारे घर मां आज डाळ बनावी छे? के बटाकानी सब्जी?

इमरान : (सर्द होत) न...न...नाही! करेला नी (जीभ चावत) कार्ल्याची भाजी दिलीये डब्यात!! का?

नमोजी : (आदेश देत) ए ना च्याले! तमे आज ग्घरे डाळ बनावजो!!

इमरान : तुम्ही कोण सांगणारे? मी कार्ली खाईन, नाहीतर पडवळ खाईन!! नकोय आम्हाला डाळ!! जाव!!

नमोजी : (युक्‍तिवाद उलटवत) खावो खावो, तमे करेला खावो! आमच्या काय ज्याते? तसाच आम्ही आमच्या कास्मीरमधी काय करायच्या ते तुम्ही कशाला सांगते? करेला पण तबियतला च्यांगलाज असते! खावो खावो!! एंजोय!! हाहा!! जय श्री क्रष्ण!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com