ढिंग टांग :  वापसी !

ब्रिटिश नंदी
Friday, 27 September 2019

बेटा : (धडाकेबाज एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण! आयॅम बॅक, मम्मा!!

मम्मामॅडम : (तडफेने कागदपत्रे हातावेगळी करत) ओके! नेऽऽक्‍स्ट!

बेटा : नेक्‍स्ट काय? आणखी कोण येणार आहे?

मम्मामॅडम : (भानावर येत) तू होय! मला वाटलं व्हिजिटर आहेत कोणीतरी!! हल्ली फार काम पडतं नं मला!! सारखं कुणी ना कुणी भेटायला येत असतं किंवा अशी कागदपत्रं बघावी लागतं! यू नो, मी पुन्हा एकदा बिझी झालेय!!

बेटा : (आठी घालत) कळतंय मला तुझं टोचून बोलणं!!

मम्मामॅडम : मी कशाला टोचून बोलीन बेटा! काही तरीच तुझं!! कधी आलास? भूक लागली असेल तर-

बेटा : (धडाकेबाज एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण! आयॅम बॅक, मम्मा!!

मम्मामॅडम : (तडफेने कागदपत्रे हातावेगळी करत) ओके! नेऽऽक्‍स्ट!

बेटा : नेक्‍स्ट काय? आणखी कोण येणार आहे?

मम्मामॅडम : (भानावर येत) तू होय! मला वाटलं व्हिजिटर आहेत कोणीतरी!! हल्ली फार काम पडतं नं मला!! सारखं कुणी ना कुणी भेटायला येत असतं किंवा अशी कागदपत्रं बघावी लागतं! यू नो, मी पुन्हा एकदा बिझी झालेय!!

बेटा : (आठी घालत) कळतंय मला तुझं टोचून बोलणं!!

मम्मामॅडम : मी कशाला टोचून बोलीन बेटा! काही तरीच तुझं!! कधी आलास? भूक लागली असेल तर-

बेटा : (घुश्‍शात) तुझ्या घराशी आलो तेव्हा माझा सदतिसावा नंबर होता! 

मम्मामॅडम : (आश्‍चर्यानं) तू कशाला रांगेत उभा राहिलास? थेट आत यायचं की!

बेटा : (हाताची घडी घालून) दाराशी खुर्ची टाकून अहमद अंकल बसले आहेत नेहमीप्रमाणे! ते ओळखपत्र पाहून आत सोडतायत एकेका व्हिजिटरला!!

मम्मामॅडम : (नाराजीनं) मग तू नेहमीप्रमाणे मागल्या दारानं का नाही आलास?

बेटा :   मी खिडकीतून आलो!! अहमद अंकल म्हणाले की ‘अपॉइण्टमेंट घेतली नसेल तर लाइनसे आओ’!!

मम्मामॅडम : (जावळ कुर्वाळत) गेला नाही का अजून तुझा राग? इलेक्‍शनमध्ये असं काहीच्या काही झालं म्हणून किती डोक्‍यात राख घालून घ्यायची माणसानं! इलेक्‍शन येतात नि जातात! आपण आपलं काम नको का करायला?

बेटा : (गंभीर चेहऱ्याने) मी पुन्हा एकदा ॲक्‍टिव व्हायचं ठरवलंय मम्मा!

मम्मामॅडम : (समाधानाने) शाब्बास! मला माहीत होतं की एक ना एक दिवस तू मम्माच्या मदतीला धावून येणार!!

बेटा : (चिडून) पण माझ्या माणसांना अहमद अंकल तुला भेटूच देत नाहीत, अशी तक्रार आहे! ‘टीम रागा’च्या माणसांना प्रायॉरिटी नाही, असं म्हणतात म्हणे ते!!

मम्मामॅडम : (खुलासा करत) आता ते पुन्हा ॲक्‍टिव झालेत ना!! म्हणून होतंय असं!! तुझ्याकडे पार्टीची सूत्रं होती, तेव्हा अहमद अंकलना पक्षाच्या कार्यालयात चहासुद्धा मिळत नव्हता!

बेटा : (दातओठ खात) त्याचा सूड घेतायत का ते?

मम्मामॅडम : (मृदूपणाने) नाही रे! तू पक्षाचं काम सोडलंस, तेव्हापासून हे अस्सं चालू आहे!! मी तरी काय करू? कुणी मदतीला नाही की कुणी पाठिंबा देत नाही!! एकटीनं सगळा गाडा पुन्हा ओढायचा म्हंजे...

बेटा : (हाताची घडी सोडत) मैं हूँ ना!

मम्मामॅडम : (उत्साहाने) काय ठरवलंयस आता?

बेटा : (उजळलेल्या आवाजात) महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचाराला जायचा प्लॅन आहे! पिंजून काढतो सगळा महाराष्ट्र!! आपली पार्टी पुन्हा तिथे सत्तेत आली पाहिजे!!

मम्मामॅडम : (खोल आवाजात) उरली आहे का आपली पार्टी तिथे? आधी उमेदवार शोधू या, मग ठरवू जिंकण्याबिंकण्याचं!!

बेटा : (दुर्लक्ष करत) इथून वर्ध्याला जाणार! सेवाग्रामपासून एक पदयात्रा काढणार! गांधी जयंतीच्या शुभमुहूर्तावर मी पुन्हा एकदा ॲक्‍टिव होणार! 

मम्मामॅडम : (विलक्षण आनंदाने) कानाला किती सुखद वाटतंय म्हणून सांगू?

बेटा : (निर्धाराने) तिथं मुंबईत एक जोरदार इव्हेंट करू या आपण! मतं मिळालीच पाहिजेत!!

मम्मामॅडम : (बुचकळ्यात पडत) कसला इव्हेंट?

बेटा : (उत्साहात) ‘हौडी रागा!’ अशा नावाचा! दणक्‍यात होऊन जाऊ दे! कशी वाटली आयडिया?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article on politics