ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

दिल्लीच्या बादशहाविरुद्ध उधोजीराजांचा मोर्चा, शिवाजी पार्कच्या बंधूंच्या ‘हम्म्म’ होकाराने राजकारणात नवे समीकरण?
Dhing Tang: The Hummm... Roar! A Satirical Take on Maharashtra Politics by British Nandi

Dhing Tang: The Hummm... Roar! A Satirical Take on Maharashtra Politics by British Nandi

Sakal

Updated on: 

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : पुन्हा तलवार उपसण्याची.

राजाधिराज उधोजी महाराज अस्वस्थपणे अंतःपुरात येरझारा घालत आहेत. मधूनच हातातील अदृश्य तलवारीने हवेतील (अर्थातच अदृश्य) शत्रूवर घाव घालत आहेत. हर हर महादेव, है शाब्बास, हाय रं गब्रू’ अशा वीरोचित आरोळ्या (एकटेच) ठोकत आहेत. मधूनच काहीतरी शोधाशोध करत आहेत. अब आगे...

उधोजीराजे : (करारी आवाजात) कोण आहे रे तिकडे?

संजयाजी फर्जंद : (डुलत डुलत एण्ट्री) बोला, महाराज! काय काम काढलं?

उधोजीराजे : (भुवई वर चढवत) राजे आम्ही की तुम्ही? प्रोटोकॉल सांभाळा!...मुजरा राहिला त्याचं काय?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com