ढिंग टांग : गतिमान विकासाची बुलेट राइड…!

इंधन बचतीच्या गप्पांतून नानासाहेबांची बुलेट राइड; मंत्रालयाच्या दारात ब्रेकच न लागल्याने शेलारमामांची धडधड वाढली
Austerity Drive: Nana-Saheb’s Bullet Ride to Mantralaya for Fuel Saving

Austerity Drive: Nana-Saheb’s Bullet Ride to Mantralaya for Fuel Saving

Sakal

Updated on

(एक थरारक वृत्तांत…)

सकाळची वेळ होती. मुंबईची उन्हे मी म्हणू लागली होती. पण अगदी मी मी म्हणत नव्हती. थोड्या वेळात म्हणालीच असती. पण तेवढ्यात मा. नानासाहेब फडणवीसांनी जाहीर केले की, आज ते मोटारीने मंत्रालयात जाणार नाहीत. महाराष्ट्राला काटकसरीची किक बसली पाहिजे. इंधन वाचवण्याला ब्रेक लागला पाहिजे. अर्थव्यवस्थेच्या कार्ब्युरेटरमध्ये ट्रम्प नावाचा कचरा अडकला आहे, तो घरच्या घरी साफ करता आला पाहिजे, या उदात्त हेतूने त्यांनी मोटारसायकलीने मंत्रालयात जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जाहीर करताना त्यांच्या मुद्रेवरून तेज ओसंडत होते, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com