

Dhing Tang humorously explores Maharashtra politics through satire featuring Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, and contemporary political developments.
Sakal
कमळे...
थांब, थांब माझे पत्र वाचून अशी अंगात आल्यासारखी वागू नकोस. काल पाऊस पडल्यामुळे मला पुन्हा काही रोम्यांटिक वाटू लागले, आणि मी तुला पत्र लिहायला घेतले, असे वाटत असेल, तर पहिले मिठाच्या पाण्याने गुळण्या कर, आणि जंताचे औषध घे! मला मुख्यमंत्री फडणवीसांच्या करिअरची काळजी वाटते, असे मी म्हणालो, हे खरे आहे. मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल तर आमचा पाठिंबा असेल, असे मी म्हणालो, हेदेखील खरे आहे. परंतु, याचा अर्थ माझ्या मनात पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत, असे नव्हे!! ही दोन्ही मते राजकीय अर्थानेच घ्यावीत. मला तुझा स्वभाव ठाऊक आहे. बोट दिले तर दंड धरून खांद्यावर चढून कानात खराबी करायची तुझी सवयच आहे.