ढिंग टांग : पोलिटिकल पोळी..!

दिल्लीपासून जंतरमंतर, मुंबईपासून सिद्धिविनायकपर्यंतचा मोर्चा; विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करताना राजकीय पोळी भाजण्याचा आरोप टाळण्याचा दोघा बंधूंचा प्रयत्न
The column humorously reflects on protests, political strategies and public discourse through fictional characters.

The column humorously reflects on protests, political strategies and public discourse through fictional characters.

Sakal

Updated on

सदू आणि दादू हे दोघे बंधू एकमेकांच्या शेजारी खुर्च्या टाकून बसले आहेत. घर सदूचं आहे, दादू पाहुणा! दोघांमध्ये आता मनोमीलन झालेलं असल्याने कसलीही भाऊबंदकी उरलेली नाही. उलट एकीचं बळ वाढलं आहे. मराठी माणसाची ताकद एकवटली आहे. या कल्पनेने दोघंही समाधानी आहेत. अब आगे...

सदू : (हातातल्या मोबाईलशी चाळा करत) दिल्लीला गेला होतास म्हणे?

दादू : (आक्रमक सुरात) सोडतो की काय! अर्थात गेलो होतो! काय जंगी स्वागत झालं माझं!! तू बघायला हवा होतास!

सदू : (नाकाला रुमाल लावत) आलो असतो रे! पण तब्येत बरी नाहीए!!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com