

Satirical take on the alleged political meeting between prominent leaders in an Indigo flight
Sakal
सदू : (कुतुहलानं फोन फिरवत सांकेतिक भाषेत) म्यांव म्यांव…म्यांव म्यांव..!
दादू : (संकेत ओळखून) कूऽऽक…कूऽऽक..! झुक झुक झुक झुक..!!
सदू : (समाधानानं) ओळखलास वाटतं आवाज!
दादू : (हळू आवाजात) आपलं ठरलंय ना! तू म्यांव म्यांव केलं, की मी इंजिनाचा आवाज काढायचा!!
सदू : (चौकशी करत) कधी आलास?
दादू : (गोधळून) कुठून?
सदू : (खुलासेवार विचारणा करत) नागपूरला विमानानं गेला होतास ना?