ढिंग टांग : पुणे म्हंजे प्रेम..!

‘पुणे म्हंजे प्रेम’ या राहुलजींच्या घोषणेनं सिंहगड हादरला; विद्येचं माहेरघर, आयटी हब आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याला प्रेमाच्या पेठांची नवी ओळख
“Pune means love!” — British Nandy turns Rahul Gandhi’s remark into a hilarious Pune-style satire, blending politics, youth culture, Pune’s identity and its legendary Mastani.

“Pune means love!” — British Nandy turns Rahul Gandhi’s remark into a hilarious Pune-style satire, blending politics, youth culture, Pune’s identity and its legendary Mastani.

Sakal

Updated on

निव्वळ सहा अक्षरांनी राहुलजींनी पुणेकरांची मने जिंकली. ‘पुणे म्हंजे प्रेम’ हे त्यांचे विधान सिंव्हगडाच्या पाषाणांवर कोरून ठेवण्याजोगे ऐतिहासिक आहे. पुण्याची ही वळख आम्हालाही नवी होती. पुणे म्हंजे प्रेम? पुण्यात मिसळ, आप्पे, खिचडी हे पदार्थ कुठे मिळतात, हे आम्ही डोळे मिटून सांगू. पण प्रेम कुठे मिळते, याची आम्हाला कल्पनाच नव्हती.

पुणे तिथे काय उणे? पुणे म्हंजे विद्येचे माहेरघर. पुणे म्हंजे आयटी हब. पुणे म्हंजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. (खुलासा : हा वादाचा विषय आहे, कां की पार्ले-डोंबोलीपासून नाशिक-नागपूर-कोल्हापूर-संभाजीनगरापर्यंत अनेक शहरांना आलटून पालटून हे विशेषण वापरता येते.) पुणे म्हंजे जाज्वल्ल्य इतिहाऽऽऽस!!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com