ढिंग टांग : बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी..!

पत्रास कारण की... उधोजीसाहेब आणि कमळाबाईंचा 'कलगीतुरा'! आमदारकीच्या शेवटच्या दिवशी शेरोशायरी अन् 'लाल बदामा'चा कल्ला
Political Satire: The Viral Letter Exchange Between Kamlabai and Udhojisaheb

Political Satire: The Viral Letter Exchange Between Kamlabai and Udhojisaheb

sakal

Updated on

सह्याद्रीचा वाघ, मऱ्हाटी दौलतीचे स्वामी श्रीश्री उधोजीसाहेब यांसी, सालंकृत सौभाग्यकांक्षिणी कमळेचा सा. न. वि. वि. फारा दिसात गाठभेट नाही. जीव झुरतो. ऊर भरून येतो. असा एकही दिवस जात नाही की इकडच्यांची आठौण येत नाही. सार्ख आप्लं ‘तुम होते तो ऐसा होता, तुम होते तो वैसा होता, तुम हर इक बात पे ऐसा कहते...’ असं ‘कभी कभी’ सिनिमातल्या अमिताभ बच्चनसार्ख चालू अस्तं. पण तुम्ही बेदर्दी बालमा आहात! तुम्हाला नै कळायचं!!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com