

A satirical depiction of Maharashtra’s changing political landscape, featuring political leaders and the emerging influence of the Gen Z generation in electoral politics.
Sakal
दादू : (घाईघाईने फोन फिरवत) म्यांव म्यांव म्यांव म्यांव म्यांव म्यांव..!
सदू : (सांकेतिक रिंगटोन ओळखून) बोल, दादूराया!
दादू : (सुखावत) सहज फोन केला! काय चाललंय?
सदू : (उदासपणाने) काय चालणार? श्रावण चालू आहे..!!
दादू : (डोळे मिचकावत) तुझी हंडी येतेय, लौकरच! आय मीन दहीहंडी!!
सदू : (सिरिअस होत) झाले का सुरू तुमचे टोमणे!!