खंडित; तरी प्रेरणास्रोत

- डॉ. सपना शर्मा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

लिखाणाच्या सुरवातीच्या दिवसांपासूनच मी माझे व्यक्तिगत अनुभव वाचकांना सांगत असते. सुरवातीला, वाचकांकडून कसा प्रतिसाद मिळेल याची धाकधूक वाटे. अशात पहिला कॉल आला तो काहीसा असा होता, ‘तुम्ही स्वतःच्या चुका आणि तुमच्या आयुष्यातल्या वाईट घटनाही मोकळ्या मनाने मांडल्या आहेत, त्या वाचून मला प्रोत्साहन मिळालं. आतापर्यंत समाजाच्या भीतीने मी सर्वच मूकपणे सहन केलं; पण आता तुमच्याकडे मन मोकळं करण्याइतकं धाडस माझ्यात नक्कीच आलं आहे. यापुढे आयुष्याकडे मी सकारात्मकपणे बघेन.’ 

मी बराच वेळ विचार करत बसले. मीही माझं आयुष्य लेखनातून मांडण्याआधी बराच विचार केला होता; पण मला जे सांगायचं होतं, त्यातील प्रामाणिकपणा आणि महत्त्व माझ्याविषयीचं सत्य कळल्याशिवाय उमजण्यासारख नव्हतं. माझ्याबद्दल काहीही माहीत नसेल, तर शब्द केवळ शब्दच राहिले असते, असं मला जाणावलं. म्हणून मी - एक काउन्सेलर, सर्वांना सल्ला देणारी व्यक्तीही किती चुका करू शकते आणि माझ्या आयुष्यातही समस्या आहेत हे सांगण्याचं ठरवलं. पहिल्या प्रतिक्रियेनंतर समान भावनांचे बरेच अभिप्राय आले. व्यक्ती वेगळ्या होत्या आणि त्यांची परिस्थिती आणि समस्याही निरनिराळ्या होत्या, पण सगळ्या अभिप्रायांमध्ये एकसारखेपणा होता - ‘तुमच्या समस्या आणि परिस्थिती वाचून आम्हाला सकारात्मकता मिळाली आणि आयुष्याशी लढण्याची शक्तीही!’

एका खंडित आयुष्यापासून प्रेरणा? हे कसं शक्‍य आहे?
हळूहळू कळायला लागलं, की प्रत्येकाला दुसऱ्याचं आयुष्य हे परिपूर्ण भासतं. मग स्वतःच्या समस्यांची तीव्रता त्यांना कमी वाटते. प्रत्येक व्यक्ती मग स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला आणि आयुष्याला सुंदर असल्याचं आवरण चढवून जगाच्या पुढ्यात ठेवते. आपलं आयुष्य परिपूर्ण असल्याचा आव आणताना, त्यातील समस्यांवर कुणाशीही चर्चा करायला मन धजत नाही. आपलं चैतन्य असेच लपवाछपवी करतं, जे नाही त्याचा भास निर्माण करण्यात संपून जातं आणि जीवन निरस होऊन राहतं.

मी माझ्या समस्यांबद्दल जितक्‍या सहजपणे बोलते आणि कशा पद्धतीनं समस्यांवर मात केली हे सांगते, तेव्हा प्रत्येक व्यक्ती सुटकेचा निःश्वास टाकते की तीही मोकळेपणाने बोलू शकते, हे लेखनाच्या आणि काउन्सेलिंगच्या अनुभवांतून मी शिकले. मग कुठल्याही समस्या असतील त्यांच्यावर मात करता येते यावर त्यांचा विश्वास बसतो. 

समस्या नाहीत असे कुठलेही आयुष्य असत नाही. त्यामुळे प्रत्येक खंडित, जखमांनी ग्रस्त, भरपूर चुका असलेलं आयुष्यही कुणा दुसऱ्यासाठी प्रेरणादायक ठरू शकतं. आपण सर्व जण समान आहोत आणि थोड्याबहुत फरकाने आपल्या समस्याही. आपल्या समस्यांना आणि चुका झाकून न ठेवता त्यांच्यावर काम करून, योग्य धडे घेऊन आपण आत्मविश्वासाने त्या जगासमोर ठेवल्या तर प्रत्येक आयुष्य हे कुणासाठी तरी प्रेरणादायक होऊ शकतं.

Web Title: editorial artical dr. sapma sharma