कल्पनेतील अपमान

- डॉ. सपना शर्मा
मंगळवार, 7 मार्च 2017

‘त्यानं मला असं म्हटलंच कसं?’ हे वाक्‍य तुम्ही किती वेळा म्हणालात आणि किती वेळा दुसऱ्यांच्या तोंडून ऐकलं? बऱ्याचदा. अगदी शब्दशः म्हटलं नसेल, तरी मनात असे आणि यासारखे विचार अनेक वेळा आले असतील.

कारण कुणीतरी तुमचा अपमान केला किंवा तसंच काही कुणीतरी बोललं, तुमचा अपमान झाला, असं तुम्हाला जाणवलं आणि तुम्हाला राग आला. मग तुम्ही चडफडत स्वतःशी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींशी असंच काहीतरी बोलून चडफडत राहिलात किंवा थेट त्या व्यक्तीला तसं सुनावून आलात. 

पण ती व्यक्ती खरंच तुमचा अपमान करत होती काय? अलीकडच्या काळात घडलेल्या काही घटना आठवून पाहा. त्या व्यक्तीबद्दलचा आणि त्या घटनेबद्दलचा तुमचा राग थोडा वेळ बाजूला ठेवून विचार करा. त्या व्यक्तीनं नेमकं काय म्हटलं होतं? ते म्हणताना त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्हाला हिणवणारे होते काय की ती व्यक्ती तुम्हाला अपेक्षित असलेलं काही तरी बोलायला किंवा करायला विसरली? ते वागणं खरंच मुद्दाम होतं काय? 

बरेचदा आपण लोकांबद्दल आपली मते बनवतो. रोजच्या आयुष्यात म्हटलं, तर असा गैरसमज हमखास आपण सासरच्या व्यक्तींबद्दल करून घेतो. मग त्या व्यक्तीनं काहीही म्हटलं तरी आपल्या मनात त्याचा नकारात्मक अर्थच लावला जातो. 

आई म्हणते ‘रात्री ओटा स्वच्छ केल्याशिवाय झोपू नकोस’, तेव्हा काही वाटत नाही; परंतु तीच गोष्ट जेव्हा सासू सांगते तेव्हा सुनेच्या मनात येतं, ‘सारख्या मला शिकवत असतात, त्यांना काय वाटतं, मला काही येत नाही?’ तसेच पुरुषसुद्धा मित्रांनी कुठल्याही थराला जाऊन केलेली टिंगल हसण्यावारी नेतील; 

पण सासरच्यांच्या तोंडून चुकून निघालेल्याला एखाद्या अनपेक्षित शब्दामुळेही ‘अपमान झाला’ म्हणून तोंड फुगवून बसतील. 

आई आणि सासू सारख्याच बोलल्या आणि तरी त्यातील एकीचं बोलणं अपमानकारक वाटत असेल, तर समस्या सासूमध्ये आहे की तुमच्यामध्ये? 
आपल्या रोजच्या आयुष्यात सहसा कुणी कुणाचा जाणूनबुजून अपमान करत नाही; परंतु प्रत्येक व्यक्ती तिला योग्य वाटेल तसं वागते. ती गोष्ट आपल्याला पटणारी नसेल किंवा कुठेतरी आपल्याला आपल्यातील कमतरतेची जाणीव करून देत असेल तर आपल्याला ती गोष्ट अपमानाकारक वाटते आणि ती व्यक्ती नकारात्मक. कितीतरी काल्पनिक अपमानाच्या फंदात सापडून आपण केवळ चांगली नातीच गमावतो असं नाही, तर आयुष्यातले कितीतरी सुंदर, दुर्मिळ असे क्षण रागाने धुमसत गमावून बसतो आणि समजा समोरच्याला तुमचा अपमान करायचाच असेल, तरी तुम्ही तो मनाला लावून घ्यायलाच हवा असं थोडंच आहे?

Web Title: editorial artical dr. sapna sharma

टॅग्स