सातत्याने निवडणूक गैरप्रकारांविषयी आरोपसत्र सुरू असले तरी त्यातून निष्पन्न काय होणार, हा प्रश्न ‘हायड्रोजन बॉम्ब’च्या कथित स्फोटानंतरही कायमच राहिला.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मदतीने २५ लाख बोगस मतदारांचा भरणा करुन भाजपने गेल्या वर्षी झालेली हरियाना विधानसभेची निवडणूक ‘चोरली’, असा आरोप करीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी बहुप्रतिक्षित ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडला.