india pakistan disturbance
sakal
अफगाणिस्तान संदर्भातील भारताच्या कोणत्याही कृतीकडे संशयाने पाहणाऱ्या पाकिस्तानची अस्वस्थता वाढली आहे.
परराष्ट्रधोरण ठरविताना देशहिताचा सांभाळ आणि संवर्धन हे सर्वोच्च ध्येय असते. त्यामुळेच परिस्थिती पाहून तात्कालिक आणि दूरगामी धोरणे ठरवावी लागतात. प्रसंगी विचारसरणीला मुरड घालावी लागते. परराष्ट्र धोरणांच्या संदर्भात सांगितल्या जाणाऱ्या या सर्व बाबींचा प्रत्यय भारताने अफगाणिस्तानातील तालिबान सरकारशी सुरू केलेल्या संवादाच्या संदर्भात येत आहे.