
भारतातून जगभरात विमानसेवा देणाऱ्या काही कंपन्यांकडून विमानांच्या देखभाल-दुरुस्तीबाबत दाखवली जाणारी सजगता अनुकरणीय आहे.
दुर्घटना शक्यतो घडूच नये, याची सर्वोच्च खबरदारी घेणे हे प्रगत व्यवस्थेचे लक्षण. तरीही दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडलीच तर त्यामागच्या कारणांचा कसून शोध घेणे, आढळलेल्या त्रुटी दूर करून सर्वांचा विश्वास पुनःस्थापित करणे, हेही चांगल्या व्यवस्थेकडून अपेक्षित असते.