

election
विविध पक्षांकडून ‘स्वबळा’चा नारा सुरू झाला आहे. हे स्वबळ म्हणजेच काही ठिकाणी संधी, काही ठिकाणी राजकीय डावपेच तर काही ठिकाणी शह-काटशह असणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून स्वबळाची भाषा बोलायला सुरूवात झाली आहे. लोकसभा आणि विधानसभेत हे दोन्ही गट युती आणि आघाडी म्हणून मतदारांसमोर गेले होते. लढतीला एकत्रित सामोरे जाण्याचा फायदा लोकसभेत महाविकास आघाडीला तर विधानसभेत महायुतीला मिळाला.