donald trump and shi jinping
sakal
जगातील दोन प्रबळ आर्थिक महाशक्तींनी आपापले व्यापारहित जपण्यासाठी तह केला आहे. त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा.
अमेरिका आणि चीन या दोन आर्थिक महाशक्तींमुळे जगाला अनिश्चिततेच्या गर्तेत ढकलणाऱ्या आयातशुल्क युद्धाची ‘तात्पुरत्या’ व्यापारसंघर्ष विरामात परिणती झाली आहे. रोमारोमात व्यापारीवृत्ती भिनलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेलगाम भाषा आणि कृतीने आयातशुल्काचे तांडव माजवले.