जगाचे पुढारपण करणाऱ्या महासत्तेच्या अध्यक्षाला जागतिक व्यापाराच्या मुद्यावर अशाप्रकारे थयथयाट करावा लागणे, हे वैफल्याचे लक्षण आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरचा दबाव वाढविण्याचा सपाटा लावला असून भारताच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणासमोर निर्माण झालेले हे एक ‘अपारंपरिक’ आव्हान म्हणावे लागेल. जागतिक व्यापारघडीची उचकापाचक सत्तेवर आल्यापासूनच ट्रम्प यांनी सुरू केली होती; परंतु भारताच्या बाबतीत उघड शत्रूभावाचा ‘मेसेज’ देण्याचा पवित्रा गेल्या अनेक वर्षांत महासत्तेने घेतलेला नव्हता.