Baba Adhav: A Lifetime Devoted to Social Equality
sakal
editorial-articles
अग्रलेख - समतेच्या संघर्षाचा सुगंध
नवतंत्रज्ञानाच्या काळात शोषणाचे स्वरूप बदलले असले तरी त्याविरोधातील चळवळींसाठी बाबा आढाव यांचे कार्य केवळ प्रेरकच नव्हे तर मार्गदर्शकही ठरेल.
बाबा आढाव आल्या-गेलेल्यांची ओंजळ सोनचाफ्याने भरून टाकायचे. पांढुरका-सोनेरी सोनचाफ्याचा दरवळ बाबांच्या आसपास सतत वावरायचा. स्पष्ट, स्वच्छ आणि नितळ असे बाबा नैसर्गिक हसतमुख असायचे. निराशा, हताशा, नकारात्मकता त्यांच्या आसपासही फिरकायची नाही. वास्तविक, बाबांचे जीवन संघर्षमय. कष्टकऱ्यांचे, असंघटितांचे लढे त्यांनी उभे केले. यशस्वी केले. कार्याचे जे क्षेत्र त्यांनी निवडले, ते अत्यंत टोकाच्या अन्यायाने ग्रासलेल्यांचे. दबलेल्या, पिचलेल्या, मोडू पाहणाऱ्या माणसांना त्यांनी एकत्र केले.
