
भारतीय राजकारणाच्या सारीपाटावर आतापर्यंत यात्रा हा प्रकार अनेकदा ‘गेमचेंजर’ ठरला आहे. राजकारण उत्तरेकडचे असो वा नाहीतर दक्षिणेकडचे, थेट लोकांपर्यंत पोचण्यासाठी नेतेमंडळींकडून यात्रा आयोजिण्यात येतात. विधानसभा रणसंग्रामाला सामोरे जाणाऱ्या मगध भूमीचे राजकारण महाआघाडीच्या ( राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या) ‘मतदार अधिकार यात्रे’मुळे ढवळून निघाले. त्याला कारणही तसेच होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने बिहारमधील मतदारयाद्यांच्या सखोल फेरपडताळणीची हाती घेतलेली मोहीम. या मोहिमेच्या माध्यमातून मतचोरी होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.