
एक कोटी चाळीस लाख महिला मतदारांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे अर्थसाह्य देऊन नितीशकुमार यांनी २२ टक्के महिला मतदार आणि त्यांच्या कुटुंबांवर गारुड केले आहे.
घोषणेआधीच असंख्य वाद जन्माला घालणाऱ्या बिहारच्या विधानसभेच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीचे अखेर बिगूल वाजले आहे. सर्वसामान्यांच्या राजकीय जाणीवा ठसठशीत असूनही गरीबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, जेमतेम दरडोई उत्पन्न आणि उपजीविकेसाठीच्या संधीच कमी त्यामुळे सदैव गांजलेल्या बिहारची ही निवडणूक त्या राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.