
GST
गेल्या आठ वर्षांत जीएसटीच्या दरांत आणि दरांच्या प्रकारांत मूलभूत बदल झाले नव्हते. त्या बदलांना सरकारने हात घातला, हे योग्य झाले. मात्र सवलती सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोचाव्यात याकडेही लक्ष द्यायला हवे.
देशापुढच्या सध्याच्या आर्थिक आव्हानांना सामोरे जायचे, तर सुधारणांच्या काहीशा अडखळलेल्या वाटचालीचे दमदार वाटचालीत रूपांतर करण्याला पर्याय नाही. मागणीला आलेली मरगळ झटकून टाकणे, देशातील खासगी गुंतवणुकीला चालना देणे, निर्यातीसाठी बाजारपेठा शोधणे, देशांतर्गत बाजारपेठेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे, ‘स्वदेशी’ला चालना देणे अशी उद्दिष्टे सरकारसमोर आहेत.