अग्रलेख : ‘हात’ दाखवून अवलक्षण

Chandrapur municipal election Congress leadership failure : नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांत महायुतीतील ‘तिघांच्या भांडणात तिघांचा लाभ’ झाला; तर विरोधकांच्या बाबतीत मात्र ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ’ झाल्याचे दिसले. चंद्रपूरचे महापौरपद संधी असूनही कॉँग्रेसने घालवले.
Chandrapur municipal election Congress leadership failure

Chandrapur municipal election Congress leadership failure

sakal

Updated on

अग्रलेख 

दीर्घकाळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अखेर सूप वाजले; पण कवित्व संपलेले नाही. कोण कुठल्या बाजूला हेच समजेनासे होणे ही बाब छोट्या पक्षांच्या बाबतीत समजू शकते. परंतु राष्ट्रीय पक्षांच्या बाबतीतही काही ठिकाणी हे घडले आहे. त्यातही कॉँग्रेस पक्षाची अवस्था तर काळजी करावी, अशीच. अनेक निवडणुकांत जनाधार आक्रसत चालल्याचे दिसले, याबद्दल या पक्षावर टीका झालीच. पण जनादेश मिळूनही त्याचे चीज करता येत नाही, ही बाब आणखी धक्कादायक म्हणावी लागेल. चंद्रपूर महापालिकेत स्पष्ट बहुमत नव्हे, पण सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरूनही या पक्षाच्या नेत्यांनी अवसानघात केला आणि सत्ता गमावली. खरे तर निवडणुका ही कोणत्याही पक्षाच्यासाठी वाढ-विस्ताराची संधी असते. पण कॉंग्रेसची नेतेमंडळी पक्ष वाढविण्यासाठी पोटतिडकीने प्रयत्न करताहेत असे दिसत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com