
आताचा ‘नॅनो बनाना ट्रेंड’ हा फक्त प्रतिमांचा खेळ राहिलेला नाही. या ट्रेडने नेटिझन्सच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाव घालत सायबर जगतामधील त्याची सुरक्षितता धोक्यात आणली.
प्रतिमा अन् माणूस यांच्यातील नातेसंबंध तसे आदिम, मानवी बुद्धिमत्तेच्या विकासाबरोबरच प्रतिमानिर्मितीचे शास्त्रही विस्तारत गेले. पृथ्वीतलावरील अन्य प्राण्यांपेक्षा आपणच कसे आखीव-रेखीव आणि बांधेसूद दिसू यासाठी माणसाने अविरत प्रयत्न केल्याचे इतिहासात आपल्याला दिसते.