

Supreme Court
sakal
न्यायालयाचे प्रशासन आणि कामकाज यांविषयी अगदी मुळापासून काही बदल करण्याची गरज आहे, हे सत्य स्वीकारायला हवे.
न्यायव्यवस्थेतील सुधारणांविषयी अलीकडे वारंवार बोलले जात आहे. वेगवेगळ्या कायदेविषयक कार्यक्रमांत व्यासपीठांवरून या सुधारणांविषयीची सुवचने ऐकणे आता सर्वसामान्य लोकांनाही सवयीचे झाले आहे. परंतु अगदी वरिष्ठ न्यायाधीशांचाही बऱ्याचदा निवृत्त झाल्यानंतरच व्यवस्थेतल्या मूलभूत प्रश्नांचा खल करण्याकडे कल असतो.