कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांना समाजात प्रतिष्ठा मिळणे आणि कायदा मोडणाऱ्यांविषयी घृणा असे चित्र सर्वत्र निर्माण व्हायला हवे.
गुन्हेगारांना पोलिसांची भीती वाटेनाशी झाली, हे दुखणे सध्या महाराष्ट्रात जाणवत आहे. त्याच्या अनेक दुष्परिणामांच्या दर्दभऱ्या कहाण्या राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून ऐकायला, वाचायला मिळताहेत आणि त्यातून पाहावी लागत आहेत ती कायदा-सुव्यवस्थेची लोंबणाली लक्तरे. या अवस्थेपर्यंत आपण कसे पोचलो, याचा मुळापासून झाडा घेण्याची वेळ आलेली आहे.