Crowd Management: भीड : जमलेली आणि चेपलेली..!

Public Safety and Crowd Control The Risks of Overcrowding: गर्दी वाढल्यास चेंगराचेंगरीचा धोका; सुरक्षिततेसाठी नियोजन आवश्यक
Crowd Control and Public Safety Why Large Gatherings Can Become Dangerous Without Proper Planning and Management

Crowd Control and Public Safety Why Large Gatherings Can Become Dangerous Without Proper Planning and Management

sakal

Updated on: 

जनक्रांतीचा शुभारंभ करणारी जबरदस्त रॅली परवा दिल्लीच्या रामलीला मैदानावर पार पडली. या रॅलीत किमान पंचवीस लाख आणि कमाल सव्वा कोटी लोक उपस्थित होते, आणि यापैकी प्रत्येकाला अनुक्रमे सर्वश्री ज्ञानेशकुमार, मोदीजी, अमितभाई शहाजी यांनी जायलाच हवे असे वाटत होते, याबद्दल आमच्या मनात तरी काही शंका नाही.

एवढी विक्रमी गर्दी बघावी लागल्याने मोदी-शहा यांच्या कमळ पार्टीचे धाबे दणाणले नसते तरच नवल होते. तरीही ‘छे, कुठंय गर्दी? खुर्च्या रिकाम्या आहेत’ छापाची शेरेबाजी त्यांनी केली. बरेचसे लोक पाच रुपयात भोजनाची सोय केल्यामुळे आले होते, असेही काही कमळ-नेत्यांनी सोदाहरण दाखवून दिले. आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले, कारण आम्हीही तेव्हा जेवतच होतो...

Loading content, please wait...