

Delhi bomb Blast
Esakal
राजधानी दिल्लीत मोक्याच्या ठिकाणी झालेल्या स्फोटाने सुरक्षा यंत्रणांपुढील आव्हानांची कल्पना येते. आता प्रत्येक पातळीवर सजगता, सज्जता वाढवावी लागेल.
अनेक दहशतवादी हल्ल्यांना यापूर्वी सामोरे गेलेल्या राजधानी दिल्लीच्या इतिहासात सोमवारी ऐतिहासिक लाल किल्ल्यासमोर झालेला भीषण स्फोट हा पहिलाच ‘आत्मघातकी दहशतवादी हल्ला’ ठरण्याची शक्यता आहे. दिल्ली उच्च न्यायालयासमोर शहरात शेवटचा दहशतवादी हल्ला सात सप्टेंबर २०११ रोजी झाला होता.