

Dhanteras Health Resolution Highlights Wellness Healthy Habits and the Importance of Health Along With Traditional Celebrations
sakal
-प्रतापराव जाधव
भारतीय पंरपरेतील वैशिष्ट्यपूर्ण आरोग्यविचार समजून घ्यायला हवा. त्यादृष्टीने या धनत्रयोदशीला आरोग्याचा संकल्प महत्त्वाचा ठरेल. त्यासाठी निरोगी सवयींचा स्वीकार करूया, प्रियजनांची काळजी घेऊया आणि प्रतिबंधक आरोग्याला आपल्या कुटुंबाच्या भविष्याचा पाया बनवूया.
“शु भं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा।” अतिशय परिचित असलेल्या या संस्कृत प्रार्थनेतील हे शब्द आपल्या परंपरेतील आरोग्य, कल्याण आणि समृद्धी यांच्यातील संबंध सुंदरपणे व्यक्त करतात. खरी समृद्धी ही केवळ भौतिक संपत्तीवरून मोजली जात नाही, तर आपल्या प्रियजनांचे आरोग्य आणि आनंदावरूनही मोजली जाते, याची आठवण ते करून देतात. दरवर्षी धनत्रयोदशी जवळ आली की, घरात दिवाळीची लगबग सुरू होते. सर्वत्र घरांची स्वच्छता केली जाते आणि सजावट केली जाते. बाजारपेठा सणाच्या उत्साहाने भरून जातात आणि लोक समृद्धीचे प्रतीक म्हणून नवीन वस्तूंचे स्वागत करतात. या उत्सवांच्या काळात, माझ्या मनात नेहमी एक साधा प्रश्न येतो: आपण आपल्या कुटुंबाच्या समृद्ध भविष्यासाठी इतकी तयारी करतो, पण त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्याकडे आपण किती लक्ष देतो?