dr gg parikh
sakal
गांधी जयंतीच्या दिवशी डॉ. पारीख या शांत, संयमी आणि समाजनिष्ठ योद्ध्याने जगाचा निरोप घेतला, हा त्यांच्या गांधीवादी व ध्येयनिष्ठ जीवनाच्या वर्तुळाला प्रतीकात्मक पूर्णविराम आहे.
डॉ. जी. जी. पारीख यांच्या निधनाने केवळ एका ज्येष्ठ गांधीवाद्याचा नाही, तर एका शतकाच्या मूल्यांचा, विचारांचा आणि समर्पणाच्या प्रवासाचा अंत झाला आहे. १९४२ मध्ये जेव्हा ‘भारत छोडो’ आंदोलन सुरू झाले, तेव्हा अवघ्या १८ वर्षांचे असलेले जी. जी. पारीख हे मुंबईतील सेंट झेविअर्स महाविद्यालयाचे विद्यार्थी होते.