अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देणाऱ्या ज्ञानेशकुमार यांना विरोधी पक्षांविषयीचा आकस लपवता आला नाही.
खेळ असो, स्पर्धा असो वा निवडणूक. हे सगळे यशस्वी होण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा घटक असतो तो तटस्थ-निःपक्ष असा पंच. पण आपली भूमिका विसरून तोच खेळाडूच्या आवेशात फटकेबाजी करू पाहील, राजकीय पक्षाप्रमाणे अभिनिवेशाने बोलेल तर या घटकाच्या विश्वासार्हतेलाच हादरा बसल्याशिवाय राहणार नाही.