
हिंसाचार नियंत्रणाबाहेर गेला असताना बीरेन सिंह यांना हटविण्याचा कोणताही निर्णय घेतला गेला नाही. क्षमायाचना केली तीही इतक्या उशिरा.
मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये तीन मे २०२३ पासून उफाळलेल्या वांशिक हिंसाचारात मणिपूर गेल्या वीस महिन्यांपासून होरपळत आहे. त्यात शेकडो निरपराधांनी जीव गमावले. पाच हजारांहून अधिक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी देणाऱ्या हिंसक जमावांनी हजारो बांधकामे नष्ट केली.