परंपरेतून आपल्यापर्यंत चालत आलेली आहारसंस्कृती टाकून देऊन नकळत आपण अनिष्ट अशा परक्या प्रभावाला कधी बळी पडलो हे कळलेच नाही. जंक आणि फास्टफूडची गुलामगिरी पत्करल्याने त्याचे फटके जाणवू लागले आहेत.
दिव्यांची आवस ऊर्फ गटारी अमावस्या हातातोंडाशी आलेली असतानाच खवय्यांच्या पोटात गोळा आणणारी बातमी यावी, हे काही बरे झाले नाही. श्रावणात बरेच जण पथ्ये, व्रतवैकल्ये पाळतात. त्याआधी चांगलेचुंगले खाऊन घ्यावे, हा माफक इरादा तितका काही चुकीचा नाही.