भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेच्या विरोधात अमेरिकी सरकार जाईल, अशी शक्यता कमी आहे. भारताने घेतलेली सावध भूमिका योग्यच आहे.
एकेकाळी खुल्या व्यापाराचे महत्त्व साऱ्या जगाला शिकविणाऱ्या अमेरिकेनेच आता एकीकडे, आयातशुल्काच्या तटबंद्या उभ्या करतानाच दुसरीकडे आपल्या उत्पादनांसाठी अन्य देशांच्या बाजारपेठांमध्ये जास्तीत जास्त शिरकाव करण्याचा प्रयत्न चालवला आहे.