

The New Cold War: US Aggression and Emerging Global Power Struggles
दोन महायुद्धे पचवणारे सारे जग सध्या आणखी एका भीषण युद्धाच्या उंबरठ्यावर उभी आहे की काय, अशी भीती निर्माण करणारे सध्याचे जागतिक वातावरण आहे. रशिया-युरोपमधील धुमसते युद्ध, पश्चिम अशियातील संघर्ष आणि महासत्तांमधील सुप्त युद्ध यामुळे एकंदरितच जगभरातली अनेक राष्ट्रे आणि बहुतेक सगळ्याच अर्थव्यवस्था तिसऱ्या महायुद्धाच्या छायेत आल्याचे चित्र आहे. दोन महायुद्धे झाली, तसे मात्र हे तिसरे संभाव्य युद्ध नसेल. त्याचे आयामच पूर्णत: वेगळे आहेत. संहाराची गणिते वेगळी आहेत, विध्वंसाचे मार्गही वेगळाले आहेत. तंत्रज्ञान, अर्थकारण आणि भू-राजकीय डावपेचांनी संपूर्ण जगाला एका अनिश्चिततेच्या गर्तेत ढकलले आहे.