
देश-परदेशात अफाट लोकप्रियता लाभलेल्या गोव्याला प्रसिद्धीचे अढळ ‘कोंदण’ लाभले आहे. सध्याही गोवा चर्चेत आहे; परंतु समाजमाध्यमांवर चालवल्या गेलेल्या एका ‘नकारात्मक’ मोहिमेमुळे. ‘गोव्यातील पर्यटन घटले’, असा ‘एन्फ्युएन्सर’कडून सातत्याने दावा होत आहे. जो गोमंतकीयांना बिलकूल मान्य नाही. वर्षाखेर आणि वर्षारंभी गोव्यातील किनाऱ्यांना भिजणाऱ्यांचा भार झाला. रस्ते गजबजले होते. वाहतूक कोंडी झाली. हॉटेले भरलेली होती. मंदिरांना भाविक झेपले नाहीत.पर्यटकांसाठीची वाहने रात्रंदिवस धावली.