

Gokul Milk Cooperative Butter Product Everything to Know About Gokul Dairy Butter and Its Market Presence in Maharashtra
sakal
कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात प्रभावी स्थान असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. संघावर पाच सरकारनियुक्त संचालक नेमण्याच्या हालचालींमुळे राजकीय आणि सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. निवडणुकीतून संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर सरकारला अशा प्रकारे संचालक नियुक्त करण्याचा अधिकार कितपत आहे; तसेच या नियुक्त्यांमागील राजकीय हेतू काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या निर्णयामुळे संघातील सत्तासमीकरणे बदलण्याची शक्यता असून, निवडून आलेल्या संचालकांचे अधिकार आणि सरकारचा हस्तक्षेप यावरून संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जे काही चालले आहे ते ‘सहकार’ वाचविण्यासाठीच असे दाखविले जात असले तरी नजर ‘गोकुळ’मधील ‘लोण्या’वर आहे, हे लपून राहिलेले नाही.